विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
परळी,(प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, उबाटा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी शहरात दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी परळी शहरात विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
परळी शहरातील विविध भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी, वातावरण भयमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले मतदारांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, परळी शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी, युवक काँग्रेस, सर्व सेल, सर्व फ्रंटचे कार्यकर्ते यांनी दि.15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती.
या रॅलीत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष जीवनराव देशमुख, डॉ. दुशंत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या परळी शहराध्यक्षा ऍड. कल्पनाताई देशमुख यांच्यासह असंख्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, धर्मराज खोसे, शीशेखर चौधरी, शिवाजी देशमुख, रणजीत देशमुख, दीपक शिरसाट, सुनील मस्के, सुभाष देशमुख, गफार शहा, वैजनाथ गडेकर, जावेद भाई, मजहर बाबा शेख, अबूतला आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
बाहेरचा उमेदवार परळीत कसा चालेल
उत्तर द्याहटवा