इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

विद्यानगर, शारदानगर, माधवबाग,पंचशीलनगर भागात राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद 

    परळी,(प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, उबाटा, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी शहरात दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी परळी शहरात विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी ठिकाणी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.


       परळी शहरातील विविध भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी, वातावरण भयमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदार बंधू-भगिनींना केले मतदारांना केले.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, परळी शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी महिला आघाडी, युवक काँग्रेस, सर्व सेल, सर्व फ्रंटचे कार्यकर्ते यांनी दि.15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विद्यानगर, शारदानगर, माधवबाग, पंचशीलनगर आदी  परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती.

     या रॅलीत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष जीवनराव देशमुख,  डॉ. दुशंत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या परळी शहराध्यक्षा ऍड. कल्पनाताई देशमुख यांच्यासह असंख्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, धर्मराज खोसे, शीशेखर चौधरी, शिवाजी देशमुख, रणजीत देशमुख, दीपक शिरसाट, सुनील मस्के, सुभाष देशमुख, गफार शहा, वैजनाथ गडेकर, जावेद भाई, मजहर बाबा शेख, अबूतला आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीस मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या