MB NEWS IMPACT:मिळाला न्याय

 MB NEWS मुळे मिळाला न्याय: 'ती' जाचक अट रद्द- महानिर्मितीने काढले शुद्धिपत्रक; वंचित शेकडो शिकाऊ उमेदवारांना मिळणार संधी !

परळी वैजनाथ,प्रतिनिधी....

       महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ तीन या पदासाठी सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीत असलेल्या एका जाचक अटीमुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो शिकाऊ उमेदवारांवर या भरती पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरची तारीख वैध म्हणून गृहीत धरण्यात येणार असल्याने एक वर्षाचे शिकावू (अप्रेंटिसशिप) प्रशिक्षण पूर्ण केलेले परळीतील सव्वाशे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. हा एक प्रकारे अन्याय असून याबाबत महानिर्मितीने तातडीने शुद्धिपत्र काढून या उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.अशा प्रकारची बातमी MB NEWS  ने सर्वप्रथम प्रकाशित केली होती.महानिर्मितीने आता शुद्धिपत्रक काढले असुन यामुळे वंचित शेकडो शिकाऊ उमेदवारांना नौकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

       महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने जाहिरात क्र. ०४/२०२४ नुसार  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेतून महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त ८०० पदे भरावयाची आहेत.तंत्रज्ञ-३ या पदाकरीता अर्ज सादर करताना आवश्यक शैक्षणिक अर्हता व उमेदवारांकरीता लागू असलेली सर्व कागदपत्रे / प्रमाणपत्रे व तंत्रज्ञ-३ या पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना अर्जात भरलेली माहिती सिध्द करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे / प्रमाणपत्रे, जसे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, कायमस्वरुपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक कार्यमुक्त प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, आय. टी. आय. / NCTVT / MSCVT/COE उत्तीर्ण प्रमाणपत्र, इत्यादी सर्व जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व दिनांक २५.११.२०२४ रोजी वैध असणे आवश्यक आहे. अशी महत्त्वपूर्ण अट घालण्यात आली होती.परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीच्या वतीने अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपलेला आहे. परंतु भरतीच्या जाहिरातीत मात्र प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हे 25 नोव्हेंबर 2024 रोजी वैध असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती.  त्यामुळे  हे उमेदवार या भरती प्रक्रियेपासून निश्चितच वंचित राहणार होते. याबाबत महानिर्मितीने शुद्धिपत्रक काढून हा अन्याय दूर करावा अशी मागणी अप्रेंटिसशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून करण्यात आली होती. याबाबत सर्वप्रथम  MB NEWS ने आवाज उठवला. त्यानंतर आता महानिर्मितीने  शुद्धिपत्रक काढले असुन यामुळे वंचित शेकडो शिकाऊ उमेदवारांना नौकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित बातमी>>तंत्रज्ञ तीन भरतीत जाचक अट: शेकडो शिकाऊ उमेदवार राहणार वंचित!

● काय आहे शुद्धिपत्रक?

          जाहिरात क्र. ०४/२०२४ अन्वये प्रसिध्द तंत्रज्ञ ३ पदाकरीता अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत, शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसाठी जाहिरातीचा अंतिम दिनांक ३१.०१.२०२५ गृहीत धरणे बाबत आणि उमेदवारांकरीता इतर सूचना असे शुद्धिपत्रक आज दि.७ जाने.२०२५ रोजी काढण्यात आले आहे. महानिर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ-३ यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरतीतर्गत जाहिरात क्र.०४/२०२४ दि.२६.११.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरील पदाच्या सरळसेवा जाहिरातीकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६.१२.२०२४ असा नमूद केला होता, तदनंतर तंत्रज्ञ-३ पदाकरीता अर्ज करण्यास दि.१०.०१.२०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. आता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादित ०२ वर्षाची सूट देण्यात येत आहे. तसेच संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्रे उपलब्ध करण्याची संधी देण्याकरीता तंत्रज्ञ-३ पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.३१.०१.२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व पूर्वावश्यकता (जसे उन्नत/प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र इ.) या दि.३१.०१.२०२५ रोजीच्या गणण्यात येतील. तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाहयस्वोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांच्या आवश्यक अनुभवाचा अंतिम दिनांक हा दि.३१.०१.२०२५ असाच गणण्यात येईल.


⏭️ "आम्ही गेल्या एक वर्षापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीच्या अप्रेंटीशीप मध्ये भाग घेतला. एक वर्ष कालावधीही पूर्ण केला. अप्रेंटिसशिप करत असतानाच भरतीची आतुरतेने वाट बघत होतो. अपेक्षेप्रमाणे जाहिरात आली पण आमच्यावर अन्याय करणारी ही जाहिरात आहे. यापूर्वी अप्रेंटीशीप चालू असतानाच्या कालावधीत जरी जाहिरात निघाली तरी ॲपियर म्हणून अर्ज दाखल करता यायचे व कागदपत्र छाननी मध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. यावेळी मात्र आमचे प्रशिक्षण 30 तारखेला पूर्ण झाले जाहिरातीत मात्र 25 नोव्हेंबर तारीख वैध धरण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ही जाचक व भरतीपासून वंचित ठेवणारी अट आहे. शुद्धिपत्रक काढून 25 नोव्हेंबर तारीख वैध ऐवजी 30 नोव्हेंबर करणे आवश्यक आहे.हा आमच्यावर घोर अन्याय आहे. याची दखल महानिर्मितीने घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा."
अशी आमची मागणी होती MB NEWS  ने आमची मागणी जोरदारपण
 बातमीतून मांडली.याची दखल महानिर्मितीने घेतली. आता महानिर्मितीने शुद्धिपत्रक काढून हा अन्याय दूर केला आहे.एमबी न्यूज व सर्व प्रसार माध्यमांचे मनपूर्वक आभार!
    - कुसुम साखरे

शिकाऊ प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, परळी वैजनाथ. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना