परळी शहरात प्रभागनिहाय नालेसफाई व स्वच्छता करून न.प.मार्फत हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी-चेतन सौंदळे
परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)
मोसमा अाधीच्या पावसानेच परळी शहरातील नाल्या व गटारीतील पाणी रस्त्यावर येवून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांना अनेक प्रभागात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नगर परीषदे मार्फत तात्काळ प्रभागनिहाय नालेसफाई व स्वच्छता मोहिमेद्वारे गटारी सांडपाणी वाहिन्यांचे प्रवाहीकरण तसेच नागरिकांच्या अडचणी व तक्रारीचे निवारण हेल्पलाईन क्रमांकाद्वारे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी परळी नगर परीषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत नगरपालिका प्रशासनाच्यावतीने अधिक्षक श्री.संतोष रोडे यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदनात परळी शहरातील ओढे,मोठया नाल्या व नदीकाठी राहणा-या तसेच शहरी वस्तीभागातील सर्व प्रभागात तात्काळ नालेसफाई व स्वच्छता मोहिम राबवून नागरिकांच्या मुलभूत गरजांकरिता यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता,पिण्याचे पाणी,पथदिवे,रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच आपत्कालिन परीस्थितीत अडचणी व तक्रारीचे निवारण व्हावे याकरिता नागरिकांसाठी नगरपालिका प्रशासना मार्फत हेल्पलाईन क्रमांकाद्वारे दखल घेण्याची मागणी चेतन सौंदळे यांनी केली आहे.
जिंदाबाद
उत्तर द्याहटवा