इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 परळी शहरात प्रभागनिहाय नालेसफाई व स्वच्छता करून न.प.मार्फत हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी-चेतन सौंदळे

परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

मोसमा अाधीच्या पावसानेच परळी शहरातील नाल्या व गटारीतील पाणी रस्त्यावर येवून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांना अनेक प्रभागात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नगर परीषदे मार्फत तात्काळ प्रभागनिहाय नालेसफाई व  स्वच्छता मोहिमेद्वारे गटारी सांडपाणी वाहिन्यांचे प्रवाहीकरण तसेच नागरिकांच्या अडचणी व तक्रारीचे निवारण हेल्पलाईन क्रमांकाद्वारे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी परळी नगर परीषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  याबाबत नगरपालिका प्रशासनाच्यावतीने अधिक्षक श्री.संतोष रोडे यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

 निवेदनात परळी शहरातील ओढे,मोठया नाल्या व नदीकाठी राहणा-या तसेच शहरी वस्तीभागातील सर्व प्रभागात तात्काळ नालेसफाई व स्वच्छता मोहिम राबवून नागरिकांच्या मुलभूत गरजांकरिता यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता,पिण्याचे पाणी,पथदिवे,रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच आपत्कालिन परीस्थितीत अडचणी व तक्रारीचे निवारण व्हावे याकरिता नागरिकांसाठी नगरपालिका प्रशासना मार्फत हेल्पलाईन क्रमांकाद्वारे दखल घेण्याची मागणी चेतन सौंदळे यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या