परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

बाजीराव भैय्या धर्माधिकारी  ‘माऊली सेवा समर्पण’ पुरस्काराने सन्मानित !

हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी,दि. २५  –

      संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘माऊली सेवा समर्पण’ या प्रतिष्ठित आशिर्वादरुपी पुरस्काराने बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

      आषाढी वारीनिमित्त संत शिरोमणी नामदेव महाराज दिंडीचे श्रीक्षेत्र नर्सी येथून वैद्यनाथ नगरीत आगमन झाले. यावेळी पार पडलेल्या पारंपरिक ‘रिंगण सोहळा’ कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. माऊली महाराजांच्या नावाने मिळालेला हा गौरव माझ्या आयुष्यात सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा आणि दिशा देईल. पुढील काळात अधिक जोमाने समाजासाठी कार्य करेन, हे माझे अभिवचन आहे.”


       या विशेष सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभाननाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊलीमामा फड, ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे, प्रसिद्ध व्यापारी संदीपसेठ लाहोटी, सुरेशराव मुंडे, नाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप खाडे, शिक्षणतज्ञ कैलासजी तांदळे, नंदकिशोर बियाणी, गणेश महाराज स्वामी, गुरुवर्य सुभाष नाणेकर, सौ. चेतनाताई गौरशेटे, सौ. राधिकाताई जायभाये, महागायक सुभाषजी शेप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते.


         संपूर्ण वैद्यनाथ नगरी भक्तिमय आणि पवित्र वातावरणाने न्हालेली असताना हा पुरस्कार प्रदान सोहळा एक संस्मरणीय क्षण ठरला. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!