शैक्षणिक वृत्त .. पाटोदा / अमोल जोशी. .....
वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत घुमरे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून सर्वप्रथम
शैक्षणिक वृत्त .. पाटोदा / अमोल जोशी. पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. विश्वजीत नवनाथ घुमरे याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आयोजित इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाटोदा तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे आयोजित इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच संपन्न झालेली होती या परीक्षेचा निकाल गत महिन्यात जाहीर झाला होता मात्र गुणवत्ता यादी दिनांक १० जुलै २०२५ रोजी जाहीर झाली या जाहीर झालेल्या यादीमध्ये व या परीक्षेमध्ये वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत नवनाथ घुमरे यांनी तालुक्यामधून सर्वप्रथम तर जिल्हा पातळीवर आठव्या क्रमांकाने तर राज्य पातळीवर अकराव्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. विश्वजीत नवनाथ घुमरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यामध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव रामकृष्णजी बांगर, मार्गदर्शिका सौ सत्यभामाताई बांगर, युवा नेतृत्व तथा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर, विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे पर्यवेक्षक संजय राख शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संतराम राजगुरू स्पर्धा परीक्षा प्रमुख एम आर नागरगोजे व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Click:♦️ _वैद्यनाथ बँक निवडणुक : उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस; आत्तापर्यंत ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल_
अभिनंदन
उत्तर द्याहटवा