मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

शैक्षणिक वृत्त .. पाटोदा / अमोल जोशी. .....

 वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत घुमरे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून सर्वप्रथम 




शैक्षणिक वृत्त .. पाटोदा  / अमोल जोशी.        पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. विश्वजीत नवनाथ घुमरे याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आयोजित इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाटोदा तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे आयोजित इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच संपन्न झालेली होती या परीक्षेचा निकाल गत महिन्यात जाहीर झाला होता मात्र गुणवत्ता यादी दिनांक १० जुलै २०२५ रोजी जाहीर झाली या जाहीर झालेल्या यादीमध्ये व या परीक्षेमध्ये वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत नवनाथ घुमरे यांनी तालुक्यामधून सर्वप्रथम तर जिल्हा पातळीवर आठव्या क्रमांकाने तर राज्य पातळीवर अकराव्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. विश्वजीत नवनाथ घुमरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यामध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव रामकृष्णजी बांगर, मार्गदर्शिका सौ सत्यभामाताई बांगर, युवा नेतृत्व तथा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर, विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे पर्यवेक्षक संजय राख शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संतराम राजगुरू स्पर्धा परीक्षा प्रमुख एम आर नागरगोजे व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Click:♦️ _वैद्यनाथ बँक निवडणुक : उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस; आत्तापर्यंत ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल_











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....