इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शासनाची सुधारीत डोंगरी क्षेत्र समावेश गावांची यादी...

परळी वैजनाथ तालुक्यातील १४ गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश

परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

       डोंगरी विभाग विकास कार्यक्रमातंर्गत सुधारीत निकष व निकषांनुसार निश्चित केलेल्या डोंगरी क्षेत्राच्या यादीत परळी तालुक्यातील १४ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. सुधारीत निकष व निकषांनुसार निश्चित केलेल्या डोंगरी क्षेत्राच्या राज्यातील समावेश करण्यात आलेल्या गावांची यादी व शासन निर्णय नियोजन विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

      महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग शासन निर्णय क्र. डोंविका- २०२१/ प्र.क्र.५८/का.१४८१-अ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: १७ जुलै, २०२५ प्रमाणे शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उपगट डोंगरी तालुक्यातील गावांच्या नावात सुधारणा करणे, नामसाधर्म्यामुळे द्विरुक्ती झालेली गावांची नावे वगळणे, डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतील यापूर्वीच्या गावांच्या नावांची छाननी इ.मध्ये सुधारणा  करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार डोंगरी विभाग विकास कार्यक्रमा तंर्गत १०१ डोंगरी उपगट तालुके व त्यातील गावांची सर्वसमावेशक एकत्रित यादी सुधारित करण्यात आली आहे.

         या सुधारीत निकष व निकषांनुसार निश्चित केलेल्या डोंगरी क्षेत्राच्या यादीत परळी तालुक्यातील १४ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. यामध्ये१) सरफराजपुर, २) गर्देवाडी, ३) करेवाडी, ४) मोहा, ५) बोधेगांव, ६) सोनहिवरा, ७) आस्वलंबा, ८) वानटाकळी, ९) दौनापुर, १०) डाबी, ११) इंदपवाडी, १२) कन्हेरवाडी, १३) भोपला, १४) देव्हाडा या गावांचा समावेश आहे.

      डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या गावांना विविध शासकीय लाभ व योजनांचा फायदा दिला जातो, जेणेकरून त्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. या विकास कार्यक्रमातंर्गत विशेष योजनांची अंमलबजावणी होत असते. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या गावांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून काही विशेष शैक्षणिक लाभ दिले जातात. त्यामुळे परळी तालुक्यातील डोंगरी क्षेत्रातील समावेशीत गावांना शासकीय निधी,योजना आदींचा आता लाभ मिळणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!