इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

'मुलगी शिकली-प्रगती झाली' : समाजाला अभिमान!

स्वकुळ साळी समाजातून पहिली कन्या झाली ‘सीए’ :  समाजाने केला गायत्री शिवगणचा गौरव 

परळी वैजनाथ, ः- परळीत आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वकुळ साळी समाजाच्या वतीने साळी समाजातून पहिली तरूणी कु.गायत्री अनिता गोविंद शिवगण ‘सीए’ (चार्टर्ड अकाऊटंट) झाल्याबद्दल तिचा साळी समाजाच्या वतीने सौ.स्वाती विलासराव ताटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी गायत्रीला प्रोत्साहन म्हणून नितीन भंडारे यांच्या वतीने लॅपटॉप बॅग भेट देण्यात आली. यावेळी गायत्रीचे वडील गोविंद शिवगण, समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस, विलासराव ताटे, नितीन भंडारे, धनंजय आरबुने आदी समाज बांधव, महिला उपस्थित होत्या.

यावेळी गायत्रीने मनोगत व्यक्त करताना म्हटले की, माझ्या या यशात माझे गुरूजन, मार्गदर्शक, वडील, काका यांचे मनापासून आभार मानले तसेच समाजातील मुला-मुलींना ‘सीए’ होण्याची इच्छा असेल अशा मुलां-मुलींना व इच्छुकांना मी योग्य ते मार्गदर्शन करेल अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त करून तिचा सत्कार केल्याबद्दल साळी समाज बांधवांचे आभार मानले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!