चिमुकलीवरील 'हैवानी' अत्याचार: प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा,आरोपी हैवानाला फाशी द्या - मागणीसाठी तीन तारखेला परळी बंदचे आवाहन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या पवित्र परळी वैजनाथाच्या भूमीत बाहेर गावाहून आलेल्या मजूर कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर हैवानी गैरकृत्य करणाऱ्या आरोपी हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, तातडीने या हैवानी वृत्तीचा बिमोड करा या मागणीसाठी तमाम परळीकरांच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
परळी रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी पंढरपूर येथून रेल्वेने आलेल्या व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका मजूर कुटुंबातील चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाने सर्व स्तरात प्रचंड चीड व संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे हैवानी कृत्य करण्याची वृत्ती परळीत निपजत असेल तर याचा वेळीच बिमोड केला गेला पाहिजे. यासाठी तमाम परळीकरांनी एकत्रित येत या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केला आहे. या हैवानी कृत्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असुन हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावी व या हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जनआंदोलन करण्याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते दि. 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद पाळून तमाम परळीकर या नीच व हैवानी घटनेचा व अशा हैवानी वृत्तीचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रमुख दोन मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देणार आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध व आरोपीला फाशी देऊन समाजात अशा हैवानी वृत्तींना सज्जड संदेश देण्यासाठी परळी बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तमाम परळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यांनीच माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे
उत्तर द्याहटवा