इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

हैवानी वृत्तीचा बिमोड करा: परळीकर सरसावले!

चिमुकलीवरील 'हैवानी' अत्याचार: प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा,आरोपी  हैवानाला फाशी द्या - मागणीसाठी तीन तारखेला परळी बंदचे आवाहन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या पवित्र परळी वैजनाथाच्या भूमीत बाहेर गावाहून आलेल्या मजूर कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर हैवानी गैरकृत्य करणाऱ्या आरोपी हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, तातडीने या हैवानी  वृत्तीचा बिमोड करा या मागणीसाठी तमाम परळीकरांच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
         परळी रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी पंढरपूर येथून रेल्वेने आलेल्या व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका मजूर कुटुंबातील चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाने सर्व स्तरात प्रचंड चीड व संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे हैवानी कृत्य करण्याची वृत्ती परळीत निपजत असेल तर याचा वेळीच बिमोड केला गेला पाहिजे. यासाठी तमाम परळीकरांनी एकत्रित येत या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केला आहे. या हैवानी कृत्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असुन हे प्रकरण  फास्टट्रॅकवर चालवावी व  या हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जनआंदोलन करण्याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते दि. 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद पाळून तमाम परळीकर या नीच व हैवानी घटनेचा व अशा हैवानी वृत्तीचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रमुख दोन मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देणार आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध व आरोपीला फाशी देऊन समाजात अशा हैवानी वृत्तींना  सज्जड संदेश देण्यासाठी परळी बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तमाम परळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या