निरंजन नागेश रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-परळी येथील निरंजन नागेश रामदासी यांचे अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी ह्रदय बंद पडून आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निधन झाले.
निरंजन रामदासी हे परळी शहरातील सुप्रसिद्ध वैद्यराज रामदासीदादा यांचे नातू व परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी यांचे पुतणे होते. निरंजन रामदासी यांच्या पश्चात आई, बहीण, आजोबा, आजी,चुलते ,चुलत्या असा मोठा परिवार आहे.
अत्यंत वेदनादायक गावभागात सर्वस्तरातून शोकसंवेदना
दरम्यान निरंजन रामदासी हे जुन्या गावभागात सर्व परिचित युवक होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणे, अतिशय नम्र, संयमी व सुस्वभावी युवक म्हणून त्यांचे गणेशपार भागात ओळख होती. त्यांच्या अशा अकाली निधनाने अत्यंत वेदनादायक अशा प्रकारची ही घटना असल्याची शोक संवेदना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
उद्या अंत्यसंस्कार
उद्या रविवार दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता येथील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राहते घर गोराराम मंदिर येथून अंत्ययात्रा निघेल. रामदासी परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.आनंद जोशी.
उत्तर द्याहटवा