दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

अकाली निधन : भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

निरंजन नागेश रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-परळी येथील निरंजन नागेश रामदासी यांचे अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी ह्रदय बंद पडून आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर  2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निधन झाले.

       निरंजन रामदासी हे परळी शहरातील सुप्रसिद्ध  वैद्यराज रामदासीदादा यांचे नातू व परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर  रामदासी यांचे पुतणे होते. निरंजन रामदासी यांच्या पश्चात आई, बहीण, आजोबा, आजी,चुलते ,चुलत्या असा मोठा परिवार आहे.

अत्यंत वेदनादायक गावभागात सर्वस्तरातून शोकसंवेदना 

      दरम्यान निरंजन रामदासी हे जुन्या गावभागात सर्व परिचित युवक होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणे, अतिशय नम्र, संयमी व सुस्वभावी युवक म्हणून त्यांचे गणेशपार भागात ओळख होती. त्यांच्या अशा अकाली निधनाने अत्यंत वेदनादायक अशा प्रकारची ही घटना असल्याची शोक संवेदना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

उद्या अंत्यसंस्कार 

उद्या रविवार दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता येथील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राहते घर गोराराम मंदिर येथून अंत्ययात्रा निघेल. रामदासी परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....