युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार

 पंकजाताई मुंडे यांनी केला नागापूर सेवा सोसायटीवर विजयी उमेदवारांचा सत्कार




परळी वैजनाथ दि. 21..
       नागापुर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सत्कार केला. यावेळी मिळालेला विजय हा सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. ही विजयी घोडदौड आगामी सर्वच निवडणूकांत कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
      यशश्री निवासस्थानी आज पंकजाताई मुंडे यांनी नागापूर सेवा सहकारी सोसायटीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर विजय नक्कीच मिळतो. म्हणून आगामी प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे यश नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करून सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले. विजयी उमेदवारांमध्ये अशोक ज्ञानोबा मुंडे, दिपक विश्वनाथ सोळंके, नागोराव तुकाराम सोळंके, परमेश्वर मोतीराम सोळंके, राहुल मदनराव सोळंके, रत्नमाला रामराव सोळंके, आत्माराम संभाजी मुंडे यांचा समावेश आहे.
       यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, जेष्ठ नेते श्रीहरी मुंडे, जि. प. सदस्य प्रदीप मुंडे, युवक नेते राजेश गित्ते, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष सोळंके,युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, कुंडलिकअप्पा सोळंके, कोंडिराम सोळंके, विनायकराव सोळंके, मिसाळ मामा, शिवराज मुंडे उपसरपंच, मदन बाप्पा सोळंके, माणिक अप्पा सोळंके, मोहन मुंडे, भाऊसाहेब मुंडे , विठल कुकर, विठल मुसळे, सुंदर सोळंके, बलभीम पांचाळ ,विजयकुमार कस्तुरे, जनार्दन मुंडे, महादेव मुंडे, वैजनाथ मुंडे, संदीपान मुंडे, शिवाजी मुंडे, मंगेश मुंडे, पवन मुंडे, महेश मुंडे ,चंद्रकांत मुंडे, अंकुश मुंडे ,जनर्धन मुंडे अबा ,रवी मुंडे ,ज्ञानोबा गडदे सर नाथराव जाधव, अंगद गंगणे, अविनाश चव्हाण, माऊली आगलावे, नितीन सोळंके, भिमराव रूपनर, कमलाकर नावंदे, आदी उपस्थित होते.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

Click- *"त्या" मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला मिळाली पाच लाखाची मदत*


⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••




















    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या