MB NEWS-पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

 सावधान ! आपण कोणते दुध वापरतो ? केमिकल पावडर पासून होतेय बनावट दुध निर्मिती !



पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात


केज :- पाटोदा तालुक्यात केमिकल पासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दुध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.

         पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले. दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे  बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी  तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पावडर तसेच दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्नभेसळ अधिकारी गायकवाड यांच्या मदतीने ते बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध व मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई अन्न भेसळ अधिकारी गायकवाड हे करीत आहेत.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार