MB NEWS-अंबाजोगाईजवळच्या शेपवाडीत भरदुपारी मंदिरात चाकुहल्ला करुन पुरोहिताचा खून

*अंबाजोगाई जवळच्या शेपवाडीत भरदुपारी मंदिरात चाकुहल्ला करुन पुरोहिताचा खून* अंबाजोगाई - शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिर येथे पोरोहित्य करणारे संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.०२) दुपारी १ वाजता घडली. भरदुपारी मंदिरात चाकुहल्ला करुन हा खून करण्यात आला असुन अतिशय धक्कादायक व खळबळजनक घटनेने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबांवर काळ कोसळला आहे. Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य* संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा व पौरोहित्याची कामे असतात. आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात अभिषेक करीत थांबले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी पांडुरंग शे...