MB NEWS-एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार

एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या परळी शहरातील कु अपर्णा गजानन चौधरी यांचा बुधवारी परळी शहर चे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कु अपर्णा गजानन चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत खडतर अभ्यास करून मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.असे पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे म्हणाले या वेळी सोबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे,सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, दै लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे, शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे, भाजपा उपाध्यक्ष महादेव ईटके, युवक नेते मनोज संकाये, नितीन समशेट्टे, सुशील हरंगुळे उपस्थित होते. हे देखील वाचा/पहा🔸 Click & watch: *विधान परिषद आमदार नियुक्तीचे 'ते व्हायरल' पत्र बनावट; राजभवनातून खुलासा* Click &watch: ⭕ *प्रवासी साखरझ...