MB NEWS-युद्धाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षणातील महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित:भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनलाच पसंती का ?

  युद्धाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षणातील महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित:भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनलाच पसंती का ?

 


      



रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. कधी काय होईल हे सांगता येणे तसे अशक्यच आहे. एमबी बीएसच्या शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी रशिया व नजीकच्या कन्ट्री, स्टेटमध्ये आहेत. सध्या रशिया युक्रेनवर जोरदार हल्ला करीत असून रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील जवळपास 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत? असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं.........


केवळ 25 लाख शुल्क.....

       येथील खासगी महाविद्यालयांची एमबीबीएसची फी भारतातील महाविद्यालयांच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या देशांत हा खर्च 1 ते 8 कोटींच्या घरात जातो. परंतु, युक्रेनमध्ये कोणत्याही महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी केवळ 25 लाखांत पूर्ण करता येते. त्यामुळे अनेक देशांतील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएससाठी जातात.


भारतात  जागा कमी........

भारतात दरवर्षी एमबीबीएसच्या केवळ 88 हजार जागा उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. दरवर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी केवळ 88 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते. तर यापैकीच काही विद्यार्थी युक्रेनसारख्या देशात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात.


नोकरीची हमखास संधी.....

युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण स्वस्त आणि दर्जेदार आहे. तसेच येथील अभ्यासक्रमाला जागतिक मान्यता आहे. भारतात युक्रेनमध्ये घेतलेल्या एमबीबीएसच्या पदवीला मान्यता आहे. भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची हमखास संधी मिळते. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. पीसीबी विषयासह 12 वीत 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण आणि नीट स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी 3,500 ते 5,000 इतकी अमेरिकन डॉलर्स फी असते.

--------------------हे देखील वाचा-पहा-----------------------

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*

👉 🌑 *आज जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे नेत्ररोग तपासणी शिबिर सुरू*

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक* 

👉🏵️ *परळीत आज सायंकाळी शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी विद्रोही जलसा;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भैय्यासाहेब आदोडे*



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार