इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२

  आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२



मेष-मानसिक ताणतणाव निर्माण होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

वृषभ-आपसात वादविवाद होतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे.


मिथुन-व्यावसायिक व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर मात कराल. भागीदारीमध्ये लाभ संभवतो.


कर्क-नोकरदारांसाठी लाभदायक दिवस ठरेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल.

Click:-*बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण*

Click:-*बीडमध्ये गोळीबार.....* _जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडल्या गोळ्या_

सिंह-पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.


कन्या-जमिनीसंबंधित कामांमध्ये अडचणी येतील. कौटुंबिक वादविवाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक आहे.


तूळ-कलागुणांना वाव मिळेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. जवळच्या मित्रांचे प्रेम, सहकार्य लाभेल.


वृश्चिक-वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसान होण्याची शक्यता आहे.


धनु-प्रयत्नांना यश मिळेल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या सहवासाने प्रसन्नता लाभेल. मनसोक्त खरेदीचा आनंद घ्याल.


मकर-प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. कोणालाही जामीन राहू नका. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. अनावश्यक खर्च होईल.


कुंभ-सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.


मीन-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या