*बागझरी येथील चिमुकल्यांचा मृत्यूची घटना वेदनादायक ; पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली हळहळ*
Click:- 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट
परळी ।दिनांक २६।
बागझरी ता. अंबाजोगाई येथे झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूची घटना अतिशय वेदनादायक असून मनाला चटका लावणारी आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे या शेतमजुराच्या कुटुंबातील श्रावणी (वय 4), साधना ( वय 5 ) या दोघींचा सकाळी मृत्यू झाला, त्यानंतर अवघ्या काही तासात आठ महिन्याचे बाळ असलेल्या नारायण याचाही दुर्देवी मृत्यू झाला. या लेकरांची आई भाग्यश्री धारासुरे (28) यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले. धारासुरे कुटुंबाने घेतलेल्या रात्रीच्या जेवणानंतर सकाळी हा प्रकार घडल्याचे समजले. पंकजाताई मुंडे यांनी या घटनेची माहिती कार्यकर्त्यांकडून घेतली आणि चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले.
🕳️ *BREAKING-परळीत महीलेवर शस्त्राने सपासप वार; महिला मृत्यूमुखी.*
••••
Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.
--------------------हे देखील वाचा-पहा-----------------------
*आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*
👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा