MB NEWS-युद्धजन्य परिस्थिती:परळी तालुक्यातील बोरखेडचा आदित्य वानखेडे आर्मेनियात; युद्ध परिस्थितीचा काहीही परिणाम नाही

  युद्धजन्य परिस्थिती:परळी तालुक्यातील बोरखेडचा आदित्य वानखेडे आर्मेनियात; युद्ध परिस्थितीचा काहीही परिणाम नाही

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*









परळी (प्रतिनिधी-)

     रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. कधी काय होईल हे सांगता येणे तसे अशक्यच आहे. परंतु आम्ही जिथे राहतो त्या  भागात सुदैवाने अद्याप युद्धजन्य परिस्थिती चा परिणाम झाला नसल्याची माहिती आर्मेनियात शिक्षण घेत असलेल्या परळी तालुक्यातील बोरखेडच्या आदित्य वानखेडे यांनी दिली आहे.माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप आहेत. आम्ही आमचे शिक्षण पुर्ण करुनच निर्धाराने परत येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

👉 🌑 *आज जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे नेत्ररोग तपासणी शिबिर सुरू*

     परळी तालुक्यातील बोरखेड येथील रहिवासी माजी सरपंच सर्वपरिचित नामदेवराव वानखेडे यांचा मुलगा आदित्य सध्या  आर्मेनिया देशातील विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.मकिटर गोश आर्मेनियन-रशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये आदित्य वानखेडे एमबीबीएस करत आहे.सहा वर्षांची ही डीग्री असुन आदित्य पाचव्या वर्षात शिकत आहे.एमबीबीएसच्या शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी रशिया व नजीकच्या कन्ट्री, स्टेटमध्ये आहेत. सध्या रशिया युक्रेनवर जोरदार हल्ला करीत असून रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.परंतु आम्ही सुरक्षीत आहोत. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला असून या युद्धाचे प्रत्युत्तर सिमेपर्यंतच मर्यादीत असल्याने आम्ही जिथे वास्तव्यास आहेत तिथे कोणताही धोका नसल्याचे आदित्य वानखेडे यांनी  सांगीतले.

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक*  

     युद्धजन्य परिस्थितीत अभ्यासावरचे लक्ष विचलीत होता कामा नये, असा आम्हाला प्रशासनाकडून सल्ला दिला आहे. तसेच पालकांनीही आत्मविश्वासाने अभ्यास कर अशी सूचना केल्याने आपण वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुनच भारतात म्हणजेच परळीला पोहचू असेही त्यांनी सांगीतले.

👉🏵️ *परळीत आज सायंकाळी शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी विद्रोही जलसा;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भैय्यासाहेब आदोडे*


Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !