MB NEWS-जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!

 जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला बोलले; काही तासांतच होणार ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारण्याबाबत निर्णय!




            सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्रामपंचायतचे अर्ज भरण्यास सर्वांचं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, आता हीच अडचण जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या कानावर घातली आहे, ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे, याला आयोग काही तासातच हिरवा कंदील दाखवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, दरम्यान आयोगाकडून परवानगी मिळताच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी  म्हटले आहे, यासंदर्भात एमबी न्युज  आवाज उठवत आहे,

 

संबंधित बातमी: click:-🟥 *वेबसाईट चालत नसल्यामुळे गोंधळ ;निवडणूक फॉर्मला आँनलाईनचा फटका!*


🔸एमबी न्युज ने मांडला होता मुद्दा: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी


         राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे यामुळे अर्ज सादर करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याने उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत.अशी मागणी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.


             शुक्रवार दि. 02 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ही बाब विचारात घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा अनेक इच्छुक उमेदवार हे नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात. 


Click:- 🛑 *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज आॅफलाईन स्वीकारावे -आ.धनंजय मुंडे यांनी केली मागणी* _एमबी न्युज ने मांडला होता वेबसाईटला येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दा_


याबाबत आ.धनजय मुंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. तात्काळ याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

       दरम्यान या बाबतीत एमबी न्युज ने सविस्तर वृत्त प्रकाशित करुन नागरिकांना येणाऱ्या अडचणीचा मुद्दा पुढे आणला होता.याची दखल घेत आ.धनंजय मुंडे यांनी याबाबत आता आवाज उठवला आहे.यामुळे इच्छुक उमेदवारांना येणाऱ्या अडचणी दुर होतील अशी अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !