MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Click &watch:*⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments


       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी  1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष अंकुशराव घुगे वय 35 वर्ष 3)नारायण किसनराव सांगळे वय 50 वर्ष रा. पारडी सावळी ता. औंढा जि. हिंगोली 4) त्रिवेणी अंकुशराव घुगे वय 55 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 5) शारदा कोंडीराम दराडे रा. केहाळ ता. जिंतुर जि. परभणी यांच्याविरुद्ध गुरन-278 /2022 कलम 353, 332,143,149 भा.द.वि.सह 135 मुपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि गोसावी हे करत आहेत. 


Click &read:● *1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले*


Click &watch:■ *प्राप्तिकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना नागपुरात सीबीआयची अटक, डमी उमेदवार बसवून परीक्षा*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार