MB NEWS-1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले

 1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले





सोन्याचे दागिने पाहण्यास आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना परळी शहरातील सराफा बाजारात घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिला विरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येत असून परळी शहरातील सराफा बाजारात असलेल्या बालाजी टाक या सराफा दुकानातअनोळखी तीन महिला सोन्याचे दागीने घ्यायाचे आहेत म्हणून दाखल झाल्या.सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखविलेल्या विविध सोनाच्या दागिन्यापैकी एक सोन्याचे 26.700 ग्रामचे सोन्याचे मिनीगंठण मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840  रु आहे तो दागिना सराफा व्यापारी यांची नजर चुकवत चोरून घेवुन गेल्या.
या प्रकरणी दागिना चोरी गेल्याची माहिती झाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुरन 277/2022 कलम 379 भादवि नुसार अज्ञात तीन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे कर्मचारी भास्कर केंद्रे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!