MB NEWS-श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने वै.लटपटे महाराज यांच्या कार्यक्रमाची सांगता

 श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने वै.लटपटे महाराज यांच्या कार्यक्रमाची सांगता




वै. गुरुवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज कोद्रीकर यांच्या गोड जेवण निमित्ताने मातोश्री चंद्रभागा आश्रम परळी वैजनाथ येथे पंचदिवशी नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची आज सांगता झाली या कार्यक्रमास  भगवान गडाचे महंत न्यायाचार्य श्री गुरु नामदेव महाराज शास्त्री यांची विशेष उपस्थिती लाभली व शास्त्री महाराजांनी  वै. लटपटे महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले अलौकिक कार्य वर्णन करत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.




तसेच समारोपाचे काल्याचे कीर्तन श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली या कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली

  तसेच पाच दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार मृदंगाचार्य गायनाचार्य यांचीही उपस्थिती लाभली या नामसंकीर्तन सोहळ्यात किर्तन प्रवचन सेवेसाठी लाभलेली महाराज मंडळी. श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री श्री ह भ प भरत महाराज जोगी हभप विठ्ठल महाराज उखळीकर ह भ प पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर ह भ प अर्जुन महाराज खाडे आळंदीकर ह भ प प्रभाकर महाराज झोलकर तसेच संगीत भजनाची सेवा संगीत अलंकार तुळशीरामजी महाराज आतकरे, संगीत अलंकार राहुल कुमार सोनवणे, संगीत अलंकार पंडित बाबुराव बोरगावकर, अलंकार मनोहर महाराज मुंडे गुरुजी तसेच मृदंग सोलो वादनाने आदरांजली अर्पण करण्यात आली.


Click-● *भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज यांनी परळीत येऊन वै.लटपटे महाराजांना अर्पण केली श्रद्धांजली*



.     प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, तालमणी नामदेव महाराज केंद्रे मृदंग महामेरू पंडित दासोपंत महाराज स्वामी व त्यांचे सुपुत्र शिद्धेश्वर महाराज, मृदंग रत्न पंडित महाराज गिरी, ताल रत्न भरत महाराज सोडगीर, मृदंग सम्राट विठ्ठल आबा गव्हाणे,संगीत रत्न प्रभाकर महाराज वाघचौरे, मृदंग सम्राट रामेश्वर महाराज कोकाटे, शिद्धेश्वर महाराज आंधळे,मृदंगरत्न विठ्ठल आबा कुसळवाडीकर, संगीत अलंकार सनथकुमारजी बडे भैय्या, युवा कीर्तनकार जगदीश महाराज सोनवणे,नामदेव फड,बंकट बैरागी, या सर्व महाराज मंडळीसह पंचक्रोशीतील सर्व गुणवान मंडळींनी वै. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे यांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करत आपली सेवा समर्पित केली. शेवटी कार्यक्रमाचे आयोजक - डॉ. निळकंठ ज्ञानोबामाऊली लटपटे ह भ प श्री बाळासाहेब महाराज ज्ञानोबामाऊली लटपटे  व समस्त शिष्य परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.



Click-संंबंंधित बातमी: ■ *देश विदेशात शास्त्रीय व वारकरी संप्रदायिक मृदंगवादन पोहचवणारा व अनेक साधक घडवणारा निष्ठावंत वारकरी काळाच्या पडद्याआड!*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !