परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

 जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परळीत सुरु होणार 'माधव भवन'

स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, सौरभ दादा खेडेकर यांच्या उपस्थितीत ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन ; शोभायात्रेचेही आयोजन



परळी/प्रतिनिधी दि.२९- स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे,सौरभ दादा खेडेकर हे परळीच्या दौऱ्यावर येणार आहेत.सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. माधव (आप्पा) जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटनाचा सोहळ्याचे आयोजन रविवार दि.३० एप्रिल रोजी करण्यात आले असून यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थीती या सोहळ्याला असणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी हालगे गार्डन येथे सुरू असून संपूर्ण परळी तालुक्यासह परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले आहे.मोंढा परिसरात असलेल्या माधव भवन येथे ॲड माधव जाधव मित्र मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.


ॲड.माधव जाधव मित्र मंडळाचे संपर्क कार्यालय परळी येथे सुरू होत आहे या कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य प्रमुख युवराज तथा माजी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे,संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या शुभहस्ते मोंढा परिसरात माधव भवन येथे कार्यालयाचे उद्घाटन होणार असून,उदघाटन कार्यक्रमाआधी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले गेले आहे.मवैद्यनाथ कॉलेज समोरून या रॅलीला सुरुवात होणार असून पुढे मौलाना अबुल कलाम आझाद चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,रेल्वे स्टेशन परिसर,स्टेशन रोड,गोलाई,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक,नेहरू चौक,या मार्गे हालगे गार्डन येथे पोहचणार आहे.हालगे गार्डन येथे मान्यवरांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वाघमोडे माजी सभापती जि. प.समाजकल्याण बीड हे असणार आहेत तर,प्रमुख अतिथी म्हणून भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट,वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव मुंडे,रिपाई आठवले गटाचे नेते महेंद्र निकाळजे, शिवक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गव्हाणे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे,एम आय एम चे तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई,शिवसेना(शिंदे गट तालुकाध्यक्ष) शिवाजी शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश हालगे,मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांची उपस्थिती असणार आहे.या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. माधव जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Video 













Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!