इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यकारिणी :अध्यक्ष केदार कुलकर्णी, उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी गजानन कुलकर्णी तर सचिव पदी गणेश जोशी

 भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यकारिणी :अध्यक्ष केदार कुलकर्णी, उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी  गजानन कुलकर्णी तर सचिव पदी गणेश जोशी



परळी वैजना, प्रतिनिधी...

     दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परळीत मोठ्या उत्साहात भगवान परशुराम सार्वजनिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी केदार कुलकर्णी, उपाध्यक्षपदी ओंकार कुलकर्णी, गजानन कुलकर्णी, सचिव पदी गणेश जोशी तर कोषाध्यक्ष म्हणून प्रवीण तोताडे यांची निवड करण्यात आली आहे .


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


         दरवर्षी परळी शहरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही त्याच उत्साहात भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी संत जगमित्र नागा मंदिर येथून सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजक सकल ब्राह्मण समाज परळीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान सार्वजनिक भगवान परशुराम जन्मोत्सव व शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट