MB NEWS::सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण महत्वाचे-प्रा. आर. एस यादव

 सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण महत्वाचे-प्रा. आर. एस यादव


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  विचारधारेने शोषितांचे उत्थान -अभियंता प्रफुल्ल भदाणे

 

परळी /प्रतिनिधी 


सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध प्रबोधनकार  प्रा. आर. एस ‌. यादव यांनी केले ते  दि. 14 एप्रिल रोजी परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील थर्मल कॉलनी  येथे महात्मा जोतिबा फुले आणि  डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समितीच्या आयोजन कार्यक्रमात केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे हे होती.


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


या प्रसंगी  मंचावर उपमुख्य अभियंता एच के अवचर, अधीक्षक अभियंता  एस.एन.बुकतारे , आर.पी.रेड्डी,  सी. ए. मोराळे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी उपस्थित होते

सविस्तर माहिती अशी की,मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण  करण्यात आले.तसेच सामूहिक पंचशील वंदना घेण्यात आली.

यादव पुढे म्हणाले की ,बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय

 आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.  जोतिबांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.असे सविस्तर विवेचन प्रा. यादव यांनी  केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  विचारधारेने शोषितांचे उत्थान निश्चितच होईल असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता आर एस कांबळे, सुरेश गर्जे, प्रशांत वंजारी,एस बी उदार, सतीश मुंडे, राहुल वाकळे, भागवत देवकर, कपिल कांबळे, महेंद्र शिंदे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, शिवाजी होटकर, देविदास देवकते, हरिभाऊ गित्ते, सुनील काळे आदींची उपस्थिती होती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्त उत्सव समितीचे सचिव प्रदीप चव्हाण यांनी केले उपस्थितांचे आभार संतोष चातुर्बोज यांनी मानले.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !