मराठा आरक्षण : परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढून केली जोरदार घोषणाबाजी

 मराठा आरक्षण : परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढून केली जोरदार घोषणाबाजी



परळी वैजनाथ....

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना हिसक वळणाच्या घटनाही घटना दिसत आहेत. यातच वेगवेगळ्या पद्धतीने मराठा आंदोलक सुचेल त्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी टायर जाळणे, बस जाळणे ,रस्ते अडवणे, आत्महत्या आदींसह अनेक प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात घडताना दिसत आहेत. यातच आज परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढत काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.

Click- ■ *आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू*
             एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत युवक आंदोलक हे परळीच्या उपविभागीय कार्यालय या प्रशासकीय इमारतीवर चढले होते. या ठिकाणी  चढून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाची मागणी केली .ठिकठिकाणी होणाऱ्या या अशा प्रकारच्या आंदोलनामुळे प्रशासनाची घालमेल होत असून तारांबळ उडताना दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !