इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी : १८ जण जखमी २ गंभीर

 ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी : १८ जण जखमी २ गंभीर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
      ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि.३० रोजी पहाटे २.४५ वा.सुमारास परळीजवळ घडली या आपघातात १८ जण जखमी तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
            ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पांगरी ता. परळी वै जि बीड येथे पहाटे २.४५ वा.सुमारास पलटी झाला. तातडीने  108 रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाली.या अपघातात 18- ते 20 व्यक्ती ट्रकमध्ये होते.यातील 2 गंभीर जखमी असुन बाकीचे किरकोळ जखमी झालेआहेत.सर्व  रुग्णांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले. तसेच गंभीर रुग्णांनाअंबेजोगाई येथे दाखल करण्यात आले आहे.सर्व मजूर मानवत  जि परभणी येथील आहेत. घटनेची माहिती कळताच परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी आपघातग्रस्तांना उपचारार्थ मदत मिळण्यासाठी कार्यवाही केली.तातडीने  108 रुग्णवाहीका घटनास्थळी  दाखल होत सर्व रुग्णांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट