सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक- कृषिमंत्री धनंजय मुंडे

 सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक- कृषिमंत्री धनंजय मुंडे




मुंबई दि. 10 जानेवारी- 

प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले


'पर ड्रॉप मोअर क्रॉप'अर्थात प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणींबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


Click:■ *नाशिक जिल्ह्यात कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबवणार-कृषिमंत्री धनंजय मुंडे*


 यावेळी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष के एम महामूलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास, तसेच शासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Click:● *दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले*



 सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनातील नियमावलीत बदल करून उत्पन्नाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढवणे यासाठी शासन सकारात्मक आहे. महाडीबीटी पोर्टल वरील अडचणींची सोडवणूक करण्यात येईल,असे यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासित केले. तसेच इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करा असे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Click:■ *परळीच्या मोंढ्यात तुंबळ हाणामारी: एकाला डोके फुटेपर्यंत केली मारहाण*













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !