MB NEWS-काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा

 काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी साजरा केला दसरा



*मोठ्या उत्साहात परळीकरांचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी*


*धनंजय मुंडे यांनी भाजपसह विविध पक्षाच्या पेंडॉल मध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा*


*धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केले अभिवादन*


परळी (दि. 06) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला. श्री. मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिर परिसरात येणाऱ्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता. परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती. धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.


 भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या पेंडॉल मध्ये जाऊनही संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 


अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी काळरात्री मंदिराजवळच असलेल्या बौद्ध विहार येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादान केले. 


याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, रा.कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, ऍड. गोविंदराव फड, बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. मधुकरराव आघाव, दिपकनाना देशमुख, माणिकभाऊ फड, प्रा. विनोद जगतकर, दत्ता भाऊ सावंत, सय्यद सिराज, राधाकृष्ण साबळे, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, महादेव रोडे, जयराज देशमुख, नितीन रोडे, जालिंदर नाईकवाडे, रवी मुळे, धम्मा अवचारे, यांसह पदाधिकारी व असंख्य परळीकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !