पोस्ट्स

MB NEWS:10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा

इमेज
 ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️                                  -------------------------- 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा*                                   -----------------------------------         💥 कोल्हापूर, 23 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली.गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.विजय...

MB NEWS:परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे

इमेज
 * परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे* *मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी* परळी/प्रतिनिधी...परळी शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते परळी शहराला नगरपालिकेच्या वतीने दर पाच दिवसाला पाणीपुरवठा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे केला जात होता परंतु आता वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी शहराला एक दिवसाआड करून पाणीपुरवठा करावा व परळी करांची तहान भागवावी अशी मागणी  परळी नगरपालिकेचे  मुख्याधिकारी  यांच्याकडे  निवेदनाद्वारे  परळी मार्केट कमिटीचे  उपसभापती  प्रा. विजय मुंडे  यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे.    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वान प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा आगामी काळासाठी आरक्षित सुद्धा राहिला पाहिजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी परळी करांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे तसेच शेतकरी सुद्धा आनंदित झाला आहे कारण वान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतीसाठी सुद्धा...

MB NEWS:वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून १०.७७ कोटींची थकहमी *राजकीय विरोध आपल्या जागी, कारखाना आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे - धनंजय मुंडे*

इमेज
 * वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून १०.७७ कोटींची थकहमी  *राजकीय विरोध आपल्या जागी, कारखाना आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे - धनंजय मुंडे* मुंबई (दि. २३) ---- : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास १० कोटी ७७ लाख रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही हमी मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. एकीकडे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे देणे थकीत असून दुसरीकडे ऐन विधानसभा निवडणूक काळात कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने कर्मचारी उपोषणाला बसले, त्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. यावर्षी परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे ध...

MB NEWS:पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

इमेज
  पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार परळी वैजनाथ ,प्रतिनिधी        पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केले आहे.    जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज मात्र शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्ज मागणीसाठी 30 सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी 30 सप्टेंबर 20 20 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत.जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांची माहिती तलाठी व सोसायट...

MB NEWS:केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन

इमेज
  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी मागणीसाठी शेतकरी संघटनेने केले खासदार निवासस्थानासमोर आंदोलन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - देशात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न पेटत असताना केंद्र शासनाने कांदा पिक आवश्यक वस्तू कायद्यातून वगळून शेतकऱ्यांवर आन्याय केला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम स्वरुपी उठवावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने खासदार निवासस्थानासमोर आंदोलन केले.        कांदा निर्यात बंदी व कांदा पिकाला आवश्यक वस्तू कायदा यातून वगळने या निर्णयाच्या विरोधात  शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले.यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास सोळंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व लोकसभेत खासदारांनी आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली.    या आंदोलनात अशोकराव नरवडे  ( बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना ) कैलास सोळंके (बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी ) अॅड राहुल सोळंके (शेतकरी संघटना परळी तालुका अध्यक्ष)  छञभुज नरसाळे ...

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : आज 197 पॉझिटिव्ह तर 1055 निगेटिव्ह

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : आज 197 पॉझिटिव्ह तर 1055 निगेटिव्ह*- ------------ * बीड 52 ,अंबाजोगाई 28, आष्टी 20, धारूर 14, गेवराई 8, केज 17, माजलगाव 17, परळी 21, पाटोदा 12, शिरूर 4 तर वडवणी तालुक्यात 4 रुग्ण

MB NEWS:परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य

इमेज
  परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य  परळी वै: दि 22 प्रतिनिधी परळी शहरातील उच्चभ्रू नागरी वस्ती म्हणून ओळख असलेल्या प्रिया नगर भागात मागील एक महिन्यापासून पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.रात्रीच्या वेळी पादचारी अंधारात चाचपडत आपला मार्ग शोधीत असल्याने पावसाळयात अनेक वेळा पाय घसरून लोटांगण घतल्याच्या घटना घडल्या आहेत. परळी शहरात लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वास्तव्य असलेल्या प्रिया नगर हा भाग परळी शहरातील उच्चभ्रू,नोकरदार वर्गाची निवासी वस्ती असलेला भाग असून या भागात नागरिकांची मोठी रहदारी असते. या भागात भगवान विद्यालय ही शाळा देखील असून हा भाग नेहमीच नागरी सुविधा देण्यासंदर्भात दुर्लक्षित राहिलेला आहे.यातच भर म्हणून या भागातील पथ दिवे मागील एक महिन्यापासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी या भागातून पायी चालणे मोठया जिकरीचे बनले असून रात्री जसे जंगलातून जात आहोत असे वाटते यातच भर मनुन पाऊस पडल्यावर या भागात अनेक वेळा अंधारात रस्ता न दिसल्याने पादचारी पाय घसरून पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या बाबतीत विद्युत वितरण कपंनीला विचारणा केली असता ...