पोस्ट्स

MB NEWS:महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे*

इमेज
 * महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून पवार साहेबांनी लोकशाहीची ताकत दाखवून दिली - धनंजय मुंडे* *भाजपला आता 'जय' चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची भाजपला टोलेबाजी* परभणी (दि. २१) ----- : ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात ही केवळ लोकशाहीची ताकत असून ही किमया करणारे खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाजप नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला आहे, पराभूत मानसिकतेत भाजप पदवीधरची निवडणूक लढवत आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ना. मुंडे बोलत होते.  धनंजय मुंडे यांच्या आधी नव्यानेच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. श्री गायकवाड या...

MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा गाळप शुभारंभ दि. 25 नोव्हेंबर रोजी

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदीपन उत्साहात  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ पुन्हा गतवैभव प्राप्त करील - फुलचंद कराड  शेतकऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्यालाच ऊस देण्याचे आवाहन  परळी वैजनाथ दि. २१....        वैद्यनाथ कारखाना यावर्षी पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्धार अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली " वैद्यनाथ" पुन्हा गतवैभव प्राप्त करील असा विश्वास व्यक्त करून शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस न देता वैद्यनाथलाच ऊस द्यावा असे आवाहन कारखान्याचे जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी आज केले. दरम्यान कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.         वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज फुलचंद कराड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक सर्वश्री शिवाजी गुट्टे, पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, व्यंकटराव करा...

MB NEWS:*मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ*

इमेज
  *मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवार दि.२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.        राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते व आ.संजय दौंड यांच्या उपस्थितीत रविवार दि.२२ रोजी सकाळी ११ वा. प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. इमदादुल उलुम प्राथमिक शाळा प्रांगण,पाॅवर हाउसच्यामागे परळी वैजनाथ येथे समारंभ होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अंजुमन एज्युकेशन सोसायटी व विनीत मराठवाडा पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडी प्रचार समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

MB NEWS:परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती!

इमेज
  मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचाऱ्याना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासा साथ द्या - सिद्धेश्वर मुंडे     परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,मानवत,सेलू,जिंतूर व परभणी येथील पदवीधरांची सिद्धेश्वर मुंडेंनाच पसंती! औरंगाबाद प्रतिनिधी दि.20.... औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत,सेलु,जिंतुर परभणी येणे प्रचार दौरा करत पदवीधर मतदारांसी संवाद साधला.परभणीतील पदवीधरांची पसंतीत सिध्देश्वर मुंडे मुंडे असल्याचे दिसून आले. सध्या पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.मुंडे यांनी दि.19 रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलु,जिंतुर व परभणी येथे प्रचार दौरा करत पदवीधरांच्या बैठका घेतल्या. सोनपेठे येथील पदवीधरांसी संवाद साधताना त्यांनी मराठवाड्यातील पदवीधर व पदवीधर कर्मचारी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला साथ देण्याचे आव्हान केले.सध्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रश्न जशाच्या तसेच कसे काय राहीले असा सवाल ही मुंडे यांनी उपस्थित केला. परभणी जिल्ह्यातील दौऱ्...

MB NEWS:बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट दया* खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली परिवहन मंत्र्यांकडे मागणी

इमेज
 * बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट दया* खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली परिवहन मंत्र्यांकडे मागणी बीड.दि.२०----- बीड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी मुंबई येथे बेस्ट बसची वाहतूक सेवा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येत असल्याची माहिती समजताच खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना बेस्ट बसच्या वाहतूक सेवेतून सूट द्यावी आणि मुंबईत बेस्टमध्ये कर्तव्य बजावण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी बेस्टच्या वाहतूक सेवेचे कर्तव्य दिल्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्या आहेत.बीड जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या चारशे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मुंबईला बेस्टमध्ये वाहतूक सेवेसाठी पाठवण्यात आले होते.यापैकी १४६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाची लागण झालेल्या एस....

MB NEWS:मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची आ.कपील पाटील यांची मागणी

इमेज
  मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची आ.कपील पाटील यांची मागणी  मुंबई दि.२० – सोमवार पासून मुंबई वगळता राज्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश राज्यसरकारने दिल्या नंतर पालक आणि विद्यार्थी वर्गातून चिंता व्यक्त केली जात असल्याने आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर भागातील शाळाही तूर्त बंद ठेवण्याची मागणी केली आहे.           एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे उच्चस्तरीय पातळीवरून सांगण्यात येत असताना व मागच्या आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत जात असताना राज्यसरकारने येत्या 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या कितपत अंमलात येतील याबद्दल पालकांना शंका आहे. शिक्षणापेक्षा बालकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे मत कित्येक पालक बोलून दाखवत आहेत. या सर्व प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले असून ऑनलाईन शिक्षण ...

MB NEWS:परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे.

इमेज
  परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे परळी वै. (प्रतिनिधी) ः परळी तालुक्यातील कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर कृती समितीची दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सीटू कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने तहसील कार्यालयापुढे दुपारी १ वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संयुक्त कृतीसमितीचे निमंत्रक प्रा.बी.जी.खाडे यांनी दिली. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी व कामगार संघटांच्या महासंघाने दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुर्वीचे कामगार कायदे रद्द केले आहेत व कामगारांचेे हक्क हिरावून घेतले आहेत. नविन कामगार कायद्याला कामगार संघटनांचा विरोध आहे. केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायदा शेतकरी विरोधी असून या कायद्याला देशातील सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने कामगार संहितेची निर्मिती फक्त उद्योगपतीच्या फायद्यासाठीच केलेली आहे. त्यात कामगारांच्...