पोस्ट्स

MB NEWS-लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी* _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_

इमेज
 * लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*  _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_ बीड । दिनांक २६। लाॅकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणारांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे, तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष...

MB NEWS-एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इमेज
  एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई परभणी.......         अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्वीकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे आज गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.         याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी️ 1 लाख रूपय...

MB NEWS-लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

इमेज
  लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात ! कायदेभंगाचा गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत- आ.धस  आष्टी, प्रतिनिधी......       लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात उतरले आहेत.व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसाला लाॅकडाऊनचा प्रचंड त्रास होतो.यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध करत गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत असे आ.धस यांनी सांगितले.        याबाबत तहसीलदार यांना आ.सुरेश धस यांनी निवेदन दिले.लाॕकडाऊनला आ.सुरेश धस यांनी तीव्र विरोध करत व्यापा-यांसह निवेदन देण्यात आले.सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपुर्ण ताकदनिशी मी उभा आहे.वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्यांची मला सवय असल्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी यावेळी दिला आहे.

MB NEWS-लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक

इमेज
  लॉकडाऊनच्या  विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक बीड, प्रतिनिधी....     बीड जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.परंतु केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास व्यापारी संघटना निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.  सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना  बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. त्यांचा विचार न करता  सरळ लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक व्यापारी या गोष्टीमुळे परेशान होणार तर आहेच परंतु आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहेेत. जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस  व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत....

MB NEWS-बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

इमेज
बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश   बीड,दि.24(जि.मा.का.):- जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. वरील कालावधीत सक्षम अधिकारी यांचे  परवानगी शिवाय बीड जिल्हयात  प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्हयात  येणाऱ्या सर्व सिमा सिल, बंद करण्याचे निर्देश श्री. रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  मुभा देण्यात आलेल्या काहींना  वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्यानुसा...

MB NEWS-बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी

इमेज
  बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात नागरीकांना आवश्यक सेवा कालमर्यादेत सुरू राहणार तर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहनांना संपूर्णतः बंदी बीड.......       आज बीड अधीकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले की बीड जिल्ह्यात (दि.२५.०३.२०२१ च्या मध्यरात्रीपासून) दि.२६.०३.२०२१ ते ०४.०४.२०२१ बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन असेल असे आदेश जारी केले त्यामध्ये कोणता व्यवसाय चालु राहतील ते खालील प्रकारे आहे. १. सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपुर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील .  २. उपहारगृह , सर्व अनुज्ञप्त्या , रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल्स , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . ( कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण , नाष्टा , चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून )  ३. सर्व केशकर्तनालय / सलुन / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील .  ४. शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर...

MB NEWS-बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन

इमेज
  बीड जिल्ह्यात 10 दिवसाचे लॉकडाऊन  बीड.....बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली करत असल्याने हा आकडा वाढतो आहे. बीड जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांचे दुकान सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने अखेर बुधवार पासून बीड जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप  यांनी घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. हा लॉक डाऊन 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांसाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे. यामुळे 25 मार्चला सायंकाळी ७ वाजता बंद केलेली दुकाने ५ अप्रीलाच उघडणार आहेत.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.