पोस्ट्स

MB NEWS-एकनाथराव कराळे यांचे निधन

इमेज
  एकनाथराव कराळे यांचे निधन परळी/प्रतिनिधी..... जुन्या परळीतील संत श्री. सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक वारकरी सांप्रदायाच्या चळवळीत अखेरपर्यंत कार्यरत राहिलेले एकनाथराव तात्याराव कराळे (वय ९०) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांचे वडील व माजी नगरसेविका जमुनाताई बालासाहेब कराळे यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने कराळे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी,तर बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी मंजूर*

इमेज
 *पंकजाताई आणि प्रितमताईं मुंडेंच्या प्रयत्नांना यश ; जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार* *परळी - गंगाखेड महामार्गासाठी २२४ कोटी,तर बीड शहरातुन जाणाऱ्या रस्त्यासाठी ५६ कोटी मंजूर* सीआरएफ अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले ७५ कोटी! बीड । दिनांक ०१ । केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने रस्ते विकासासाठी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.परळी-गंगाखेड मार्गासाठी दोनशे चोवीस कोटी रुपये,बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी छप्पन कोटी रुपये तर केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता,त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यानिमित्ताने मोठे यश आले आहे. बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून केली जात होती.शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासा...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली 'ऑनलाईन' वार्षिक सर्वसाधारण सभा* *'वैद्यनाथ' चे पुढील हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट* _*अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी केले पंकजाताई मुंडे यांचे कौतुक !*_

इमेज
 * पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ कारखान्याची उत्साहात पार पडली 'ऑनलाईन' वार्षिक सर्वसाधारण सभा*  *'वैद्यनाथ' चे पुढील हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट*  _*अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी केले पंकजाताई मुंडे यांचे कौतुक !*_ परळी वैजनाथ दि. 31......       वैद्यनाथ कारखाना हा बीड जिल्ह्याच्या बाजारपेठेचा आर्थिक कणा आहे. ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि कर्मचारी यांच्या हितासाठी वैयक्तिक नुकसान सहन करून कारखाना सुरू केला. माझ्या प्रयत्नाला सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याचे नियोजन असून असेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.            पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आज उत्साहात संपन्न झाली. अनेक सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन उत्स्फूर्त प्रतिसा...

MB NEWS-ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प .केशव महाराज उखळीकर*

इमेज
 * पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँके चा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात संपन्न* * ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प . केशव महाराज उखळीकर* *पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खा.ओमराजे दादा निंबाळकर, वाल्मीकआन्ना कराड यांनी दिल्या शुभेच्छा* *परळी वैजनाथ प्रतिनिधी* परळी शहरात नव्यानेच रुजू झालेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी ली बँकेचा आज मंगळवार दि 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. आज मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी परळी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साई प्रेम आर्कड, शॉप नंबर 3 परळी वैजनाथ येथे पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून व फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मध...

MB NEWS-लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी* _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_

इमेज
 * लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा* *पंकजाताई मुंडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*  _हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या_ बीड । दिनांक २६। लाॅकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणारांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे, तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष...

MB NEWS-एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इमेज
  एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई परभणी.......         अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्वीकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे आज गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.         याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी️ 1 लाख रूपय...

MB NEWS-लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

इमेज
  लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात ! कायदेभंगाचा गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत- आ.धस  आष्टी, प्रतिनिधी......       लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात उतरले आहेत.व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसाला लाॅकडाऊनचा प्रचंड त्रास होतो.यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध करत गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत असे आ.धस यांनी सांगितले.        याबाबत तहसीलदार यांना आ.सुरेश धस यांनी निवेदन दिले.लाॕकडाऊनला आ.सुरेश धस यांनी तीव्र विरोध करत व्यापा-यांसह निवेदन देण्यात आले.सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपुर्ण ताकदनिशी मी उभा आहे.वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्यांची मला सवय असल्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी यावेळी दिला आहे.