पोस्ट्स

MB NEWS- *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !*

इमेज
 *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !* अध्यात्ममाने मनशुद्धी होते,सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शक - अजय मुंडे _नामवंत किर्तनकारांची परळीत मांदियाळी_ परळी......ता. २ - शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.अध्यात्ममाने मनशुद्धी होते व सर्व धर्म सम भाव आणि सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शकच आहेत असे यावेळी श्री. मुंडे म्हणाले.परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

MB NEWS-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली

इमेज
  सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू के ली जाईल. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका  सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. राज्यात सध्या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्या...

MB NEWS-नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*

इमेज
 * बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधांवर* *नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही-ना. धनजंय मुंडे*  *आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ, पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश*     बीड, ( जिमाका) दि. २:- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना. मुंडेंनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.  आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावाचा पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गे...

MB NEWS-परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला*(VIDEO

इमेज
  परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला जलसाठे भरत असल्याने  समाधानाचे वातावरण परळी वैजनाथ | प्रतिनिधी. .........         परळी तालुक्यातील  कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस सुरू  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.     बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ...

MB NEWS-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे* _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_

इमेज
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषी मंत्री दादा भुसे  _किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन_ *परळी वै.दि.१ प्रतिनिधी*      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार कंपन्यांचे पैसे देणार नाही. किसान सभेच्या शिष्टमंडळाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.      २०२० चा खरीप पिक विमा मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी बुधवारी (ता.१) सकाळी दहा वाजता भेट घेतली. सरकारच्या वतीने कृषी मंत्री भुसे यांच्यासह, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विमा कंपनीचे अधिकारी व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. अजित नवले, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. ३० ऑगस्ट रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयावर किसान सभेनी मोर्चा काढुन दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषांगाने ही बैठक घेण्यात आली. या बैठ...

MB NEWS- *बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर

इमेज
बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर 🕳️  _परळी प्रखंड कार्यकारीणी जाहीर;दहा जणांना नियुक्त्या_  🕳️ परळी वैजनाथ, प्रतिनिधी........            विश्व हिंदू परिषदे अंतर्गत परळी प्रखंडाच्या कार्यकारीणी ची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभ मुहूर्तावर (दि.   ३०।०८।२०२१-२२ सोमवार) रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परळी-वैद्यनाथ प्रखंड समिती कार्यकारिणीतील  नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्री मुरलीजी जयस्वानी, श्री. प्रा. कवी, जिल्हा उपाध्यक्ष बीड श्री. संभाजी भणगे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत  परळी प्रखंड कार्यकारिणीच्या दहा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. नितीन बालासाहेब राजूरकर (बजरंगदल शहर संयोजक), श्री मिरकिले साहेब (प्रखंड ...

MB NEWS- बीड:जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन*

इमेज
  जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन बीड : दि 1 प्रतिनिधी बीड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा भावसार समाजाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे बुधवार दि 1 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भावसार समाजाचे सर्वपरिचित असे व्यक्तिमत्त्व तथा शहरातील मे.नारायणराव पतंगे क्लाथ सेंटर चे मालक श्री.जगन्नाथ पतंगे यांचे सकाळी 7 वाजता त्यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.मृत्यू समयी त्यांचे वय 62 होते.त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,2 विवाहित मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  बीड शहरातील जुन्या पिढीतील मनमिळवू,शांत व्यक्तीमत्व म्हणून व्यापारीवर्गात व भावसार समाजात त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.