पोस्ट्स

उपोषणावर उद्या मार्ग काढणार.....!

इमेज
ना. पंकजा मुंडेंनी जालन्यात उपोषण कर्ते दीपक बोऱ्हाडे यांची घेतली भेट धनगर समाजाच्या आरक्षणावर आमच्या मनात संवेदना ; समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका जालना ।दिनांक २७। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आमच्या मनात संवेदना आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.    राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देऊन उपोषण सोडण्याची विनवणी केली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मागच्या ११ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरु आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी इथे आलेले आहे. त्यांनी केलेल्या मागण्या मागच्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात ...

जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी...

इमेज
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगावी ! राज्य आपत्कानील कार्य केंद्राच्या सूचना मुंबई, दि. २६:- भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ऑरेज आणि रेड अर्लट असलेल्या जिल्ह्यांना खबरदारी व पूर्वतयारीची कार्यवाही तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असून २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दि. २७ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार त...

दुर्दैवी घटना....

इमेज
  शेतकऱ्याने केली गळफास लावून आत्महत्या केज :- केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदुरघाट ता. केज जवळ असलेल्या ढाकणवाडी येथे आज दिनांक २६ सप्टेंबर, शनिवार रोजी पहाटे ५:०० वाजता रामभाऊ नानाभाऊ ढाकणे (रा. ढाकणवाडी ता. केज) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना एक ते दीड एकर जमीन असून ते इतरांची शेती देखील बटईन करीत होते. आत्महत्येचे कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेल्याने ते निराश झाले असल्याने त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

प्राणघातक हल्ला...युवकाचा खून!

इमेज
  धारदार शस्त्राने वार करत बीडमध्ये युवकाचा खून! बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका युवकाचा  धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे.   माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी यश ढाका या युवकांवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच कोसळला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खून कोणत्या कारणावरून झाला याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. प्रथमदर्शनी प्राप्त माहिती....       यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.  बुधवारी रात्री शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे . द...

चोरांचा सुळसुळाट.....

इमेज
धाडसी चोरी :4 तोळे सोने आणि 20 तोळे चांदीचे दागिने केले लंपास परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मौजे नंदागवळ येथे बुधवारी रात्री उशिरा धाडसी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी चार तोळे सोने व 20 तोळे चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, परमेश्वर गीते व सौ. मंडाबाई गीते हे नंदागौळ येथील आपल्या घरामध्ये एका खोलीला कुलूप लावून दुसर्‍या खोलीत झोपले. दिनांक 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर "चोर चोर" असा आवाज आल्यामुळे दोघे जागे होऊन बाहेर आले असता त्यांच्या दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडलेले दिसले. आतील लोखंडी कपाटही उघडे व आतील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले असता सौ. मंडाबाई परमेश्वर गीते यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी कपाटातील 4 तोळ्याच्या सोन्याचे दागिने व 20 तोळे चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.        सौ. मंडाबाई गीत...

दुर्दैवी घटना: खिशात चिठ्ठीही आली आढळून

इमेज
ओबीसी आरक्षण संपलं: आता पोलीस भरतीत माझी मुलं लागत नाहीत, विवंचनेतून परळीत ओबीसी बांधवाने संपवलं जीवन खिशात चिठ्ठीही आली आढळून परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      आपली दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र आता आपलं ओबीसीचे आरक्षण संपलं, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही. त्यांना इतर कामधंदा व्यवसाय टाकून द्यायला आपल्याकडे पैसेही नाही, संपत्तीही नाही, शेतीही नाही आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही अशा विवंचनेतून परळी तालुक्यातील टोकवाडी येथील एका ऑटो चालकाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयताच्या खिशात अशा प्रकारची एक चिठ्ठीही आढळून आली आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.            याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, टोकवाडी येथील ऑटो चालक आत्माराम भांगे हे टोकवाडी -परळी प्रवासी ऑटो चालून आपली उपजीविका भागवत असायचे. त्यांना आदित्य व आदर्श अशी दोन मुले आहेत. या मुलांचे शिक्षण झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून मुले पोलीस भरतीची तयारी करत ह...

नवरात्रोत्सव विशेष: वैशिष्ट्यपूर्ण मंदिर...

इमेज
नवरात्रोत्सव:अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानीचे इथे एकत्रित घडते दर्शन  परळीजवळील तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले मंदिर  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        सध्या नवरात्रोत्सव सुरु असुन शक्तीची आराधना करत विविध देवींच्या मंदिरांमध्ये दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. विविध भागात विविध देवींची ठिकाणे असतात त्यापद्धतीनेच त्या त्या ठिकाणची वेगवेगळी वैशिष्ट्ये बघायला मिळतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पंचक्रोशीत पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली विविध देवदेवतांची ठिकाणे आहेत. मात्र परळीजवळील एक देवी मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.हे मंदिर पुरातन नसले तरी याठिकाणी अंबाबाई,रेणूकामाता व तुळजाभवानी असे एकत्रित दर्शन घडते.तीन शक्तीपीठांचा अद्वितीय संगम असलेले एक मंदिर गोपीनाथगडावर आहे. त्रिमुर्ती शक्तीपीठांचा अनोखा धार्मिक संगम हे याठिकाणचे वैशिष्ट्य ठरले आहे.              गोपीनाथगड हे ठिकाण परळीपासुन काही अंतरावरच आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथगड म्हणून नावारुपाला आलेले आहे.आज एक...