इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

चोरांचा सुळसुळाट.....

धाडसी चोरी :4 तोळे सोने आणि 20 तोळे चांदीचे दागिने केले लंपास




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मौजे नंदागवळ येथे बुधवारी रात्री उशिरा धाडसी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी चार तोळे सोने व 20 तोळे चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, परमेश्वर गीते व सौ. मंडाबाई गीते हे नंदागौळ येथील आपल्या घरामध्ये एका खोलीला कुलूप लावून दुसर्‍या खोलीत झोपले. दिनांक 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर "चोर चोर" असा आवाज आल्यामुळे दोघे जागे होऊन बाहेर आले असता त्यांच्या दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडलेले दिसले. आतील लोखंडी कपाटही उघडे व आतील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले असता सौ. मंडाबाई परमेश्वर गीते यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी कपाटातील 4 तोळ्याच्या सोन्याचे दागिने व 20 तोळे चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

      सौ. मंडाबाई गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या