इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

प्राणघातक हल्ला...युवकाचा खून!

 धारदार शस्त्राने वार करत बीडमध्ये युवकाचा खून!




बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे.
 
माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी यश ढाका या युवकांवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच कोसळला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खून कोणत्या कारणावरून झाला याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

प्रथमदर्शनी प्राप्त माहिती....

      यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाला असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट झाला आहे . दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात सुरज आप्पासाहेब काटे वय वर्ष, रा. बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक दुबाले, राहुल शिंदे आणि मनोज परजणे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या