रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

 रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त होणार पुरस्काराचे वितरण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

   गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मरडसगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या मसला येथील जि. प. शाळेवर कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स

क्लब गोल्डसिटी च्या वतीने दिला जाणारा आदर्श  शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एका सोहळ्यात त्याचे वितरन होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.


    याबाबत माहिती अशी की, शिक्षणाचे माहेरघर म्हणून गणल्या जाणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील धावडी या गावच्या भूमिपुत्र असलेल्या व सध्या 

गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या मसला येथील जि. प. शाळेवर कार्यरत असलेल्या उपक्रमशील तथा विद्यार्थीप्रिय शिक्षिका रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लब गोल्डसिटी च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श  शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रेखा नेहरकर या जि. प. अंतर्गत 2003 पासून ज्ञानदानाचे कार्य करतात. सर्वप्रथम 2003 साली हिंगोली येथील जि. प. शाळेवर त्या रुजू झाल्या. त्यानंतर 2007 पासुन त्या परभणी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रेखा नेहरकर या अतिशय उपक्रमशील शिक्षिका असून शैक्षणिक उपक्रमात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी कसा होईल यासाठी त्या प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे, विविध प्रकारच्या स्पर्धा घेणे, यासह कृतीयुक्त अध्यापनासाठी त्या नेहमीच आग्रही असतात. निसर्गप्रेमी असणाऱ्या रेखा नेहरकर यांनी विवीध ठिकाणी शालेय परिसरात वृक्षारोपण केलेले आहे. त्यांच्या या कृतिशील सेवेबद्दल त्यांचा गंगाखेड लायन्स क्लब गोल्डसिटीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन होणारा सन्मान अभिमानास्पद असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !