परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम

 हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम






  परळी प्रतिनिधी ----जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतिहास, समाजशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री सदाशिवराव मुंडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड ,बीजभाषक डॉ.सतीश कदम , पुणे येथील टिळक विद्यापीठातील इतिहास विभागाच्या डॉ. नलिनी वाघमारे, प्राचार्य, अरुण दळवे ,डॉ.विनोद जगतकर, सेमिनारचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के. शेप व प्राणीशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ विनोद गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यातील विविध पैलूवर थोडक्यात विचारमंथन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून इतिहास दर्पण व समाज दर्पण या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बीज भाषक म्हणून बोलताना डॉ. कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील विविध पैलूवर प्रकाश टाकला. तसेच हैदराबाद संस्थानातील नावीन्यपूर्ण घटनांची माहिती संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगलीच भर पडली. हैदराबाद संस्थानातील विविध घटकांवर संशोधन होणे गरजेचे आहे त्याशिवाय खरा इतिहास जनसामान्यापर्यंत येणार नाही असेही मत याप्रसंगी व्यक्त केले. तर डॉ.नलिनी वाघमारे यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लोकसाहित्य विशेष संदर्भ बिदर जिल्हा यावर सखोल विवेचन केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात लोकसाहित्य किती महत्त्वाचे होते हे आपल्या व्याख्यानातून संशोधकांना सांगण्याचा प्रयत्न याप्रसंगी केला. तर डॉ. विनोद जगतकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर मांडणी केली. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले होते असेही मत यास प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.राठोड यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हैदराबाद मुक्ती लढा हे महत्त्वपूर्ण पर्व होते असे सांगून निजाम राजवटीच्या काळात तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती कशी  होती याचे विवेचन या प्रसंगी केले. या सेमिनारच्या समारोप सत्रात खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भात हैदराबाद मुक्तिसंग्राम, ज्याला ऑपरेशन पोलो म्हणूनही ओळखले जाते, या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ , आनंत भालेराव ,बाबासाहेब परांजपे या  स्वातंत्र्य सैनिकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.भारत सरकारने हैदराबाद संस्थानाला जोडण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असेही मत याप्रसंगी व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ.अर्चना चव्हाण व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले तर आभार डॉ. विनोद गायकवाड यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने प्राध्यापक शिक्षकेत्तर  कर्मचारी व बाहेरून आलेले प्राध्यापक व संशोधक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.


---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!