हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक

 लाडझरीचे माजी सरपंच आत्माराम चाटे यांचे निधन ; आज अंत्यसंस्कार




हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांचे शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पार्थीवावर आज रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लाडझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

         हरिहार आत्माराम चाटे, शिवकरण आत्माराम चाटे, शामकरण आत्माराम चाटे यांचे वडील माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे हे परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील मुळ रहिवाशी असुन मृत्यु समयी त्यांची वय ६७ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुले,१ मुलगी, सुन,जावई, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थीवावर आज परळी तालुक्यातील लाडझरी येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी सरपंच आत्माराम चाटे हे लाडझरी व बीड जिल्हात सर्व परिसरात सुपरिचीत होते. सरपंचपद तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे.  त्यांचे व्यक्तिमत्व रूबाबदार तर होतेच शिवाय ते सोज्वळ, शांत व तितकेच शिस्तीचे कडक होते. सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तीमत्व होते.  ते नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर होते.शेतीनिष्ठ प्रगतशिल शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांनी कष्टाने आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. लाडझरी व परिसरात त्यांचा नावलौकिक होता. लाडझरी गावचे सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. मागील कांही दिवसापासुन ते आजारी होते. यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. चाटे परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहेत. 

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार