MB NEWS-*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

 *महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत !*








*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*


*ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गरजू, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळतोच -डाॅ.संतोष मुंडे*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        परळी मतदार संघात  रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

        ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला याचे नाव.धनंजय मुंडे यांनी भरभरून कौतुक केले. डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोदय मार्केट येथे  हे शिबिर घेण्यात आले.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज या शिबिरात मार्गदर्शन केले.याप्रसंगी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या राशन कार्डचे वितरण करण्यात आले.

Click & Watch:*🏵️ महाराष्ट्रात झाला नसेल असा उपक्रम परळीत ; राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

         यावेळी मार्गदर्शन करताना ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले की,रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला.गेल्या 20 वर्षांपासून आपण या मतदार संघातील जनतेची अविरत सेवा करत आहे. यापुर्वीही आपण परळी व तालुक्यात हजारो राशन कार्ड वितरित केले आहेत.आता राशन कार्डचे नुतनीकरण करुन देण्यात आले आहेत.नवीन रेशन कार्ड फक्त वाटप न करता राशन कार्डचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. आम्ही दिवसरात्र आपल्या सेवेत आहोत आणि पुढेही आपल्या सेवेत असणार आहोत. 

        डॉ.संतोष मुंडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे बनले होते.  गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले. ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हे सर्वोपयोगी कार्य पार पडले असे त्यांनी सांगितले.शिबीराच्या पहिल्या दिवसापासून गरजुंनी प्रचंड गर्दी केली होती. या शिबिरात ३५०० जणांची नोंदणी झालीआहे.तर हजारो कार्ड दुरुस्ती करण्यात आले आहेत.

Video



        यावेळी  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर, प्रा.डॉ. विनोद जगतकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराज, जोगदंड, शंकर कोचे, कलिदास पवार, अरूण रोडे, संतोष गित्ते, विनायक बळवंत, गणेश सौळुंके, प्रशांत सौनार, तनमय जैन, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके व इतर उपस्थित होते. सुत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे


🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis



















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------







---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !