MB NEWS-डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी

 डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी 



उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन



राशन कार्डबाबतची सर्व कामे सुलभ पद्धतीने करुन देऊ- नम्रता चाटे



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आज शुक्रवार, दि.25 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते  उद्घाटन झाले.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तहसील मधील राशनकार्ड पद्धत सुलभ करून देण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी दिले.

    फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.25 ते 27 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर, मंडळ अधिकारी कुमटकर, पुरवठा विभागाचे कालिदास पवार, राजाभाऊ लव्हारे, केंद्रे, विठ्ठल साखरे, संतोष गित्ते,  कृष्णा बळवंत, संदिप सुधाकर काळे, संतोष आघाव, अरूण रोडे, विश्वजित मुंडे, माऊली मुंडे, गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.

     गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे.

       शिबीराच्या पहिल्या दिवशी गरजुंनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मान्यवरांचे स्वागत डॉ.संतोष मुंडे यांनी केले. या शिबिरात 980 नोंदणीझाली.तर387फाटलेले राशनकार्ड जागेवर दुरूस्ती करण्यात आले.(पिवळे व केसरी )25 वर्षांपासूनचे राशनकार्ड फाटलेले, दुरुस्ती करण्यात आले. दिवसभर नागरीकांची गर्दी शिबीरात होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले. आभार गणेश गुट्टे यांनी मानले.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार