पोस्ट्स

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       ब...

४० बालकांना वृक्षारोपण, गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती

इमेज
परळी गीता परिवाराच्या वतीने रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट! ● ४० बालकांना वृक्षारोपण,  गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष घडवली अनुभुती ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...     प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज  (किशोरजी व्यास ) यांच्या प्रेरणेने संचलित परळी गीता परिवाराच्या वतीने अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. यामध्ये ४० बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली.त्याचबरोबर या बालकांना निसर्गसानिध्य देत वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.       गीता परिवार परळी वैद्यनाथ च्या माध्यमातून संस्कारवर्ग व संस्कृतीरक्षक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने   अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेत क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला. या मध्ये 40 बालक सहभागी झाले होते.बालकांना गीतापाठ, संकिर्तनासह गोसेवेची प्रत्यक्ष अनुभुती घडवली. मुलांच्या हस्ते गाईंना गुळ, पेंढ, चारा देण्यात आला. भगवद्गीता  12 वा आणि  15 वा अध्याय पाठ एकत...

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.     ...

महाशिवरात्री विशेष लेख: वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे

इमेज
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे साक्षात भूकैलास कलीयुगाचे ------------------------------------ [ॲड.दत्तात्रय आंधळे ]       श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने  प्रशिध्द आहे .येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय. .भारताच्या  नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ  भास्कराचार्य [इ.स.११४४-१२२३]यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करणकुतूहल हे ग्रंथ  लिहले आहेत.त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे. "पुरीरक्षशां देवकन्याsथ कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//"भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी,कां...
माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गु रु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतूनभागवत कथा ज्ञानयज्ञ माजलगाव /प्रतिनिधी.........      सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव येथे श्रीमद् भागवत कथेला आज दि. 8 रोजी उत्साहात प्रारंभ  झाला. यावेळी कथा श्रवणाचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.     माजलगाव येथे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्ताने शिवाजीनगर महिला भजनी मंडळाच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी  सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते  भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळु महाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यशताब्दी निमित्त होत असलेल्या या सोहळ्यात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी १ ते ५  या वेळेत भागवतमर्मज्ञ ह.भ....

● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●

*देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया - शिवाजी मव्हाळे*  ● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ● सोनपेठ / प्रतिनिधी. .......         देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या प्रवाहात सामील झाले पाहिजे.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन देशनिष्ठ विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी स्वातंत्र्य दिन समारंभात केले.       खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर मनोगते व गीते सादर केली. प्रारंभी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोह...
इमेज
*कु.समृद्धी मनोजराव जब्दे घवघवीत यश* परळी (प्रतिनिधी)                कु.समृद्धी  मनोजराव जब्दे हिने इयत्ता दहावी शालांत परिक्षेत 90टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (10 वी ) च्या परीक्षेत परळी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोजराव जब्दे यांची कन्या कु.समृद्धी हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पालक,मित्र परिवार,शाळेचे शिक्षक व आप्तेष्टाकडुन अभिनंदन होत आहे.