पोस्ट्स

MB NEWS:दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू*

इमेज
 *⭕ दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू *  -----------------------------------  परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांची माहिती दिली. राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकं भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं. अखेर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहित...

MB NEWS:*राजकारणात मी चांगल्या गोष्टी करते, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो- पंकजा मुंडे*

इमेज
 *राजकारणात मी चांगल्या गोष्टी करते, पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो- पंकजा मुंडे*  माझ्या दारातील गर्दी कधी कमी होवू नये, एवढी शक्ती असावी हिच अपेक्षा* मुंबई दि. ०४ ------ राजकारणात काम करत असतांना मी चांगल्या गोष्टी करते, वाईट करत नाही. कधी कुणाची प्रतारणा केली नाही, दिलेला शब्द प्रसंगी स्वतःचं नुकसान करून पाळलेला आहे पण त्याचं कौतुक करण्याऐवजी संभ्रम निर्माण केला जातो. माझ्या राजकीय भूमिकांवर शंका घेणारांनीच याविषयी वेगवेगळ्या शंका निर्माण केल्या. असं करणं म्हणजेच 'अभिमन्यू' करण्यासारखं आहे असं परखड मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एका वृत्त वाहिनीशी मुलाखत देतांना व्यक्त केलं.   सावरगांव येथे झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शिवाजी पार्क भरविण्या विषयी मी जे बोलले ,त्याचा राजकीय अर्थ कुणी काढू नये,हे कुणाला उद्देशून नव्हते. मी चांगलं काम करते, त्याचं कौतुक केलं जात नाही परंतू अफवा पसरवून विनाकारण संभ्रम निर्माण केला जातो, अफवा पसरविण्याचं एक जाळ तयार केल जातयं व यालाच 'अभिमन्यू' करणं असं मी म्ह...

MB NEWS:पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन!

इमेज
पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन! • _सर्वांनी उपस्थित रहावे- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ • परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आज दि.५ रोजी महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.           विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे.या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुक्याची महत्वपूर्ण बैठक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या "जगमित्र' संपर्क कार्यालयात  गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी ...

MB NEWS:*शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*

इमेज
 ⭕⭕ *शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड* मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यांनी शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी आज (बुधवार) माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले. अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्ध...

MB NEWS: 💥💥 *सावध व्हा! राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट*

इमेज
 💥💥 *सावध व्हा! राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट* नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचा खुलासा केला आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अचानक संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणित वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ५९,५४० नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ६ हजार ७२५ नमुने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच जवळपास तब्बल ११.२९ टक्के नमुने करोना संक्रमित आढळले आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रावरचा ताण वाढणार असल्याचं दिसतंय. दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या ६ हजार ७९८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णांलयात भर्ती आहेत. ९७३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३५८ रुग्ण कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसंच २१ हजार ५२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस तपमान कमी होताना दिसतंय. त्यातच सर्दी-खोकल्याच्या आजारासोबतच कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येतही वाढ...

MB NEWS:बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
  बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा मृत्यू ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना      •कोरोना उपचारानंतर घरी परतल्यानंतर दुर्देवी निधन •  बीड, प्रतिनिधी....      बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.        कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे शिक्षक असलेले कांबळे या आधी मुंबईला होते. कुख्यात दहशतवादी कसाब आणि दहशतवाद्यांच्या बराकीच्या सुरक्षेची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अल्पावधीतच त्यांनी बीडमध्ये छाप पाडली होती. कारागृहाबाबत सामान्य जनतेची मानसिकता बदलणारा अधिकारी म्हणूनही ते ओळखले जायचे

अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार

इमेज
  अभिनव विद्यालय शुभम नितीन शिंदे यांचा सत्कार परळी वै:- ज्ञानप्रबोधीनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील शाळेचा माजी विद्यार्थी शुभम नितीन शिंदे यांनी योगेश्वरी पॉलिटेक्निक कॉलेज अंबाजोगाई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये 93% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे संस्थापक सचिव परळी भूषण मा.साहेबराव फड साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.