पोस्ट्स

MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन

इमेज
  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांचे काका स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे जाऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले.  गोरगरीब, दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा, संघर्षाचा वसा आणि प्रेरणा घेऊन काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही असे म्हणत ते त्रिवार नतमस्तक झाले.

MB NEWS:लोकनेत्याच्या जयंतीदिनी* *पंकजाताई मुंडे यांनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात* *सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

इमेज
 * लोकनेत्याच्या जयंतीदिनी* *पंकजाताई मुंडे यांनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात*  *सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद* परळी दि. १२ ------- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी  गोपीनाथ गडावर आयोजित शिबीरात स्वतः रक्तदान करून रक्तदान महायज्ञाला सुरवात केली, त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हयासह राज्यभरात ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिबीरे  आयोजित करून उत्स्फूर्त रक्तदान केले. दरम्यान, आज सकाळपासूनच लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी समाधीचे दर्शन घेतले.     लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गड विविध प्रकारच्या फुल माळांनी व विद्युत रोषणाईने सजला होता.  यंदा कोरोनामुळे दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नव्हता, तथापि सोशल डिस्टन्स व कोरोनाच्या नियमाचे पालन करून सर्वांना दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळपासूनच...

MB NEWS:खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन

इमेज
  खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस परळीत ना. धनंजय मुंडे केक कापून करणार साजरा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन परळी (दि. 10) --- : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांचा 80 वा वाढदिवस परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील मोंढा मैदान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 81 किलो चा केक कापून साजरा करण्यात येणार आहे.  मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात 12 डिसेंबर रोजी मोंढा मैदान येथे अभूतपूर्व विद्युत रोशनाई करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गरजू कुटुंबातील 5000 महिलांना साडी वाटप, छञपती शिवाजी महाराज चौक व राणी लक्ष्मीबाई टाँवर येथे पेढे वाटप, संजय गांधी निराधार लाभार्थी यांना प्रमाणपञाचे वाटप, यांसह खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रमुख कार्यक्रमाचे लोकनेते गोपिनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.  यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची परळी ...

MB NEWS:साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

इमेज
  साखळी चोर्यांच्या घटनेतील कुख्यात दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद परभणी स्थागुशा व संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी..              संपूर्ण मराठवाड्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या दोन कुख्यात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. परभणी स्थानिक गुन्हे शाखा व संभाजी नगर पोलीस ठाणे परळी यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी केली आहे.        गंगाखेड येथील एका साखळी चोरीच्या तपासात परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळीत दाखल होऊन उड्डाणपुलाखालून दोन कुख्यात आरोपींना संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.रेहान खान पठाण, इरफान खान शरीफ खान अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MB NEWS:*आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी* *_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_*

इमेज
 *आशा व गटप्रवर्तक यांचा मानधनवाढीतील फरक तात्काळ देण्याची मागणी*  *_अन्यथा १६ डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    आशा व गटप्रवर्तक यांचे  मानधन वाढीतील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर १६ डिसेंबर रोजी निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.     याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातत्याने मेहनत व सेवा बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनाचा मोबदला व शासनाने जाहीर केल्यानुसार वाढीव मानधनाच्या फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी असे आदेश असतानाही अद्याप ही रक्कम मिळाली नाही.डिसेंबर २०२० अखेर पर्यंत फरकवाढीतील रक्कम देण्यात यावी, गटप्रवर्तक यांना २५ रुपये दैनंदिन भत्ता गेल्या एक वर्षापासून मिळालेला नाही तो देण्यात यावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेचा मोबदला द्यावा, कुष्ठरोग,क्षयरोग शोध मोहीम सर्व्हेचा मोबदला पुर्वीप्रमाणेच १७५ रुपये देण्यात यावा, गटप्रवर्तक या...

नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी

इमेज
  माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी राजेंद्र सोनी यांची नियुक्ती •नगरसेवक राजेंद्र सोनी यांना प्रदेश पातळीवर नवी महत्त्वपुर्ण जबाबदारी परळी वैजनाथ - राज्यातील माहेश्वरी समाजाची मातृसंस्था असलेल्या माहेश्वरी सभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेश सदस्यपदी परळी येथील राजेंद्र सोनी यांची निवड करण्यात आली आहे.धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेणारे तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे परळी नप चे स्वीकृत सदस्य म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री,पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.दरम्यान या नियुक्ती नंतर माझ्या वरील जवाबदारी वाढली असून,माहेश्वरी समाजातील प्रत्येक घटकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष ऍड गोपाल कासट यांचे आभार व्यक्त केले आहेत.

MB NEWS:बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : सहा तालुके निरंक ; परळीचाही आजचा आहवाल निरंक

इमेज
  बीड जिल्ह्याचा आजचा कोविड अहवाल : सहा तालुके निरंक ; परळीचाही आजचा आहवाल निरंक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दैनंदिन covid-19 अहवाल हा अर्धा जिल्हा निरंक आला आहे. या अहवालात परळी तालुक्याची संख्या निरंक आली आहे.          आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात केवळ २२ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये परळी तालुक्याची संख्या निरंक आहे. जिल्ह्याची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोना संसर्गाची साखळी मात्र संपुर्णतः सुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.