पोस्ट्स

MB NEWS:समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे - धनंजय मुंडे यांनी केला खुलासा

इमेज
 # समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे - धनंजय मुंडे यांनी केला खुलासा कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.  करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यास...

MB NEWS: *भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे*

इमेज
 *भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले* *; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे* बीड दि. ०९ ----- भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात नवजात शिशूंच्या मृत्यूने मन सुन्न झाले, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.    यासंदर्भात एक ट्विट करून पंकजाताई मुंडे यांनी नवजात बालकांच्या कुटुंबियांविषयी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी" असे ट्विट त्यांनी केले आहे. ••••

MB NEWS: *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित* *कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम*

इमेज
 *दत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित*  *कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा कायम*  परळी,( प्रतिनिधी):- परळीच्या वृत्तपत्र क्षेत्रात मागील वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा कराड हॉस्पिटलच्या वतीने गौरव करण्यात येतो. 2021 वर्षीचा "रिपोर्टर ऑफ द इअर" हा पुरस्कार दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे यांना प्रदान करण्यात आला आहे. दर्पण दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड हॉस्पिटल येथे या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कराड हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालासाहेब कराड व डॉ.शालिनीताई कराड यांच्यासह मान्यवर पत्रकारांची उपस्थिती होती. 2020 हे वर्ष सर्वांसाठीच खडतर असे वर्ष होते. सर्वच क्षेत्रांसह पत्रकारिता क्षेत्रालाही कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थितीने फटका बसला होता. या संपूर्ण काळात सकारात्मक लेखनाने वाचकांच्या मनात आत्मविश्वस निर्माण करणे, समाजाच्या गरजेच्या बातम्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणे याबरोबरच वैचारिक आणि बौद्धिक लेखनाला चालना देऊन सामा...

MB NEWS: *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

इमेज
 *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा* परळी,(प्रतिनिधी):-पत्रकारितेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा सर्व सामान्यांच्या समस्या अग्रक्रमाने मांडून बदलत्या परिस्थितीची आव्हाने स्विकारावीत असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी केले.   अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दि.6 जानेवारी 2021 रोजी दै.न्याय टाईम्स कार्यालयात दर्पनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.जोशी बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, ता.समन्वय धनंजय आरबुने, जेष्ट पत्रकार ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, संपादक बालकिशन सोनी, दत्तात्रय काळे, स्वानंद पाटील, महादेव शिंदे, प्रा.प्रविण फुटके, जगदीश शिंदे, प्रा.राजु कोकलगावे, अनंत कुलकर्णी, दिगांबर देशमुख,आत्मलिंग शेटे, श्रीराम लांडगे, नरसिंग बापु अन्नलदास यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.  यावेळी प्रशांत जोशी यांनी पत्रकारीतेपुढील आव्हाने याविषयी विचार मांडले. इतर मध्ययमंचा प्रभाव वाढला तरी प्रिंट मिडीयाचे महत्व ...

MB NEWS:सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

इमेज
  सोशल मीडियाला पत्रकारांनी मित्र बनवावे –महेश कुलकर्णी   समाजहिताच्या विषयांना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे –शंकरअप्पा मोगरकर   परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा   परळी । प्रतिनिधी समाजाच्या जडण-घडणीमध्ये पत्रकारीतेचा वाटा खूप मोठा आणि मोलाचा आहे. मागील काळात पत्रकारीतेवर अनेक संकटं आली परंतू त्यावरही मात करीत करीत पत्रकारांनी आपली समृध्द वाटचाल सुरूच ठेवली आहे. अलिकडच्या काळात वृत्तपत्र माध्यमांना सोशल मीडियाशी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. परंतू बदलच्या काळाबरोबर पत्रकारांनी बदलून घेवून सोशल मीडियाला आपला मित्र बनवले पाहीजे असे मत लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मराठवाडा साथी पीसीएन न्युजच्या कार्यालयात परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परळी शहर आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पन दिन कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक महेश कुलकर्णी, दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जेष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर, नगरस...

MB NEWS:सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन. -----------------------------------

इमेज
सौ.सुमन माधवराव देशमुख ( चिखलबीडकर ) यांच निधन. ----------------------------------    परळी वैजनाथ येथील सरस्वती विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुमन माधवराव देशमुख यांच आज दिनांक 05 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अल्पशा आजारानं दु;खद निधन झालं.त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या.     त्यांच्या माघारी पती माधवराव देशमुख,कन्या सुनीता मंठेकर,मुलगा तुकाराम देशमुख,जावाई,सून,आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.जालना येथील जे.ई.एस.महाविद्यालयाचे दिवंगत प्रा.कै.भगवान काळे आणि आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक तसंच लेखक,साहित्यिक अनंत काळे यांच्या त्या भगिनी होत.     अत्यंत मनमिळावू आणि विद्यार्थिप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या सुमन देशमुख यांना आदर्श शिक्षिका म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.            *****

MB NEWS:परळी पत्रकार संघाच्या वतीने साजरा होणार दर्पण दिन महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा; आवर्जून उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन

इमेज
  परळी पत्रकार संघाच्या वतीने साजरा होणार दर्पण दिन   महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा; आवर्जून उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन   परळी । प्रतिनिधी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष संभाजी मुंडे, तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, कार्याध्यक्ष धिरज जंगले यांनी केले आहे. दरवर्षी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन 06 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कार्यक्रम होणार आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पत्रकार संघाच्या आगामी धोरण व कार्याबद्दल तसेच अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाह...